न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ फेब्रुवारी २०२०) :- सातत्याने मागणी करूनही आठवडा बाजार बंद होत नसल्याच्या निषेधार्थ थेरगाव सोशल फाउंडेशनच्या वतीने स्वाक्षरी मोहिम राबविण्यास रविवारी सरुवात करण्यात आली.
थेरगाव , डांगे चौकात रविवारी भरवण्यात येत असलेल्या आठवडे बाजारामुळे येथील सुरु असलेल्या व ग्रेडसेपरेटरच्या कामाला अडथळा येत असून येथून ये – जा करणाऱ्या वाहनांना व आपात्कालीन वाहनांना जाण्यास कसरत करावी लागत आहे. यामुळे येथे दर आठवड्याला भरवल्या जाणाऱ्या अनधिकृत आठवडे बाजाराला बंद करण्यात यावे. जेणेकरुन नागरिकांना येथून जाण्यास त्रास होणार नाही.
येथील ग्रेड सेपरेटरचे कामकाज सुरु असल्याने येथील रस्ता निमुळता झाला आहे. याबाबत थेरगाव सोशल फाऊंडेशनने आयुक्तांना पत्र देऊन तसेच स्मरणपत्र देऊनही काहीच निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे स्वाक्षरी मोहिम राबविण्यास सुरुवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी १ हजार १२ नागरिकांनी स्वाक्षरी करीत पाठिंबा दर्शवीला.












