न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीला तीन वर्षे पूर्ण झाले आहेत. या तीन वर्षांच्या कारकीर्दीचे नगरसेवकांनी प्रगतीपुस्तक जाहीर करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश देव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेले उमेदवार निवडणुकीच्या वेळी अनेक आश्वासने देतात. त्याच्या जोरावरच महापालिका निवडणुकीत अनेकजण निवडून येतात. मात्र, त्यानंतर आपल्या प्रभागातील कामे करण्याची त्या नगरसेवकांना आठवण येत नाही. त्यामुळे निवडून आलेल्या नगरसेवकांनी आपल्या तीन वर्षांत काय कामे केली लेखाजोखा द्यावा.
त्यामध्ये वॉर्डस्तरीय मिळणाऱ्या निधीचा आपण कोणत्या कामासाठी वापर केला. मतदारांच्या अडचणी आपण कशा सोडविल्या. प्रभागातील वीज , पाणी , रस्ते , ड्रेनेज , कचरा आदी कामे समाधानकारक झाली आहेत का ? या सगळ्या गोष्टींचा प्रगती पुस्तकामध्ये समावेश करावा.












