न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ फेब्रुवारी २०२०) :- भोसरी परिसरात दहशत माजविणाऱ्या ज्ञानेश्वर उर्फ ज्ञान्या लांडगे टोळीवर मोका ( महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण ) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी शनिवारी ( दि . २२ ) याबाबत आदेश दिला. ज्ञानेश्वर रामदास लांडगे ( वय : २८ ) , गणेश तिम्मा धोत्रे ( २७ , दोघे रा . गवळीमाथा , भोसरी ) , मल्लेश चेन्नवी कोळवी ( २१ , रा . चिखली ) कृष्णा विक्रम शिंदे ( २८ , रा . आदिनाथ नगर , भोसरी ) यांच्यावर मोकानुसार कारवाई करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी दिलेल्या माहितीनुसार लांडगे टोळीतील या सराईत गुन्हेगारांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. ते परिसरात दहशत माजवित होते. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांनी संघटित गुन्हे करण्यास सरुवात केली होती. वाढत्या गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी या टोळीवर मोका अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास अपर पोलिस आयुक्त पोकळे यांनी कारवाईचे आदेश दिले.












