न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ मार्च २०२०) :- भारताची जनगणना २०२१ च्या कामाच्या पहील्या टप्प्याचे कामकाज १ मे २०२० मध्ये सुरु होणार आहे. सदर कामाची पुर्व तयारी आवश्यक असून महापालिका स्तरावर पुर्वीचे सन २०११ चे जनगणना गटाचे चतु:सिमा न बदलता व पुर्वीच्या नकाशामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल न करता २०२१ करीता मुळ गटात/उपगटात घर यादी तयार करणेबाबतचे कामकाज करणेत येत आहे. त्यासाठी महानगरपालिकेने नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचा-यांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रधान जनगणना अधिकारी तथा आयुक्त, श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.
तसेच मुळ गटातील उपगट तयार करुन काल्पनिक नकाशे तयार करणेकामी क्षेत्रीय कार्यालय निहाय कार्यकारी अभियंता, क्षेत्रीय कार्यालय यांचे नियत्रंणाखाली संबंधित उपअभियंता यांची वार्ड इन्चार्ज म्हणून नेमणूक करुन त्यांचे नियत्रंणाखाली कनिष्ट अभियंता, स्थापत्य सहाय्यक, सर्व्हेअर, संबंधित करसंकलन गटाचे लिपिक, मीटर निरीक्षक शिपाई/मजूर यांच्या नेमणूका करणेत आलेल्या आहेत.
भारताची जनगणना २०२१ च्या पुर्व तयारीचे कामकाज करणा-या महापालिका कर्मचा-यांना सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेचे शहर जनगणना अधिकारी, तथा अतिरीक्त आयुक्त अजित पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.













