न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ मार्च २०२०) :- पवनाथ़डीचे उद्घाटन ४ मार्च रोजी नवी सांगवीच्या पी.डब्ल्यू.डी मैदानावर झाले. उद्घाटनानंतर नागरिकांच्या उदंड प्रतिसादात पवनाथडी उत्तरोत्तर रंगतदार झाली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महिला सक्षमीकरणासाठी राबवलेला पवनाथडी हा उपक्रम स्तुत्य असल्याचे मत सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी सांगवी येथे व्यक्त केले.
पवनाथडी २०२० च्या वतीने ४ ते ८ मार्च दरम्यान दररोज सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल नागरिकांना अनुभवता आली. सात मार्च रोजी सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा लोकगीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. कार्य़क्रमात आमदार लक्ष्मण जगताप, महापौर माई ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके, महिला बालकल्याण समिती सभापती निर्मला कुटे उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते गायक आनंद शिंदे यांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, स्थायी समिती माजी सभापती विलास मडिगेरी, सागर आंगोळकर,हर्षल ढोरे, संतोष कांबळे,मोरेश्वर शेडगे,नगरसेविका आरती चोंधे,शारदा सोनवणे,चंदा लोखंडे,माधवा राजापूरे,सीमा चौगुले.सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे ,माजी नगरसेवकअशोक सोनवणे, राजू दूर्गे,अमोल थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.उपस्थित होते.
कार्यक्रमात आनंद शिंदे यांनी एकापेक्षा एक सरस लोकगीते, सामाजिक, धार्मिक गीते सादर केली. प्रल्हाद शिंदे यांनी गायलेल्या ‘गजानना गणराया’ या गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर ‘पाऊले चालती पंढरीची वाट’, ‘बाप्पा मोरया रे’,’चल ग सखे पंढरीला’, ‘दोनच राजे इथे गाजले’ ही गीते पेश केली. तर ‘उड जायेगा एक दिन पंछी’, ‘शिट्टी वाजली’ या गीतांना रसिकांची दाद मिळाली. कार्य़क्रम उत्तरोत्तर रंगत गेला.
प्रथम सत्रात मधुराज रेसिपीच्या मधुरा बाचल यांचा संवाद कार्यक्रम सादर झाला. त्यावेळी त्यांनी आपले मराठमोळे पदार्थ बनवून खायला हवे असे आवाहन केले. डॉ. गिरिष रांगणेकर यांनी युट्युबच्या माध्यमातून लाखो महिलांच्या स्वयंपाक घरातील सोबती असलेल्या मधुरा बाचल यांची प्रकट मुलाखत घेतली. स्वयंपाकघराचे नियोजन कसे करावे, नाश्त्याचे पदार्थ, उपवास पदार्थ, चटण्या,मांसाहारी पदार्थ बनवण्यासाठीची भांडी कशी असावी याबाबत मार्गदर्शन केले. कार्य़क्रमाचे प्रास्ताविक अण्णा बोदडे यांनी केले. सूत्रसंचालन शुभांगी शिंदे,किशोर केदारी यांनी केले. आभार रमेश भोसले यांनी मानले.
लाखोंची उलाढाल
महिलांनी केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळण्याच्या उद्देशाने घेतलेल्या आणि एकूण १२२५ स्टॉल असलेल्या पवनाथडी मध्ये महिलांच्या वस्तूंना आणि पदार्थांचा चांगली मागणी मिळत आहे. महिलांनी केलेल्या खाद्यपदार्थांवरही खवय्यांनी ताव मारला. पहिल्या दिवशी पवनाथडीमध्ये ११ लाख इतका तर दुस-या दिवशी २१ लाख रुपये खप झाला. तसेच तिस-या दिवशी ४४ लाख, चौथ्या दिवशी ४५ लाख इतका खप झाला अशी माहिती समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी दिली. शनिवार आणि रविवारचा मुहूर्त साधत सकाळपासूनच नागरिकांनी पवनाथडी मध्ये उपस्थिती दर्शवली












