न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च २०२०) :- देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डाच्या हद्दीतील काळोखे मळ्यातील दाम्पत्य यांना संशयित म्हणून बुधवारी सकाळी पुण्यातील नायडू रुग्णालयात तपासणीसाठी दाखल केले होते. प्राथमिक तपासणीनंतर कोरोना संदभार्तील लक्षणे आढूळन न आल्याने घरी पाठविण्यात आले आहे. देहूतील संत तुकाराम बीजोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या वाऱ्यासारख्या बातमीने खळबळ उडाली आहे.
देहुगाव येथील काळोखे मळ्यातील एक दाम्पत्य व त्यांची दोन मुले २१ फेब्रुवारीला एका खासगी ट्रॅव्हल कंपनीच्या माध्यमातून दुबईला गेले होते. ते २७ फेब्रुवारीला घरी परतले. त्यांच्या पत्नीला मंगळवारी खोकल्याच्या त्रास होऊ लागल्याने ते माळीनगर येथील खासगी दवाखान्यात तपासणीसाठी गेले होते. तेथे त्यांनी डॉक्टरांना नुकतेच दुबई टूर करून परत आल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच डॉक्टरांनी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र देहूला कळविले. त्यांनी ही माहिती देहूरोउ कॅन्टोमेंट बोर्डाच्या रुग्णालयाला कळविली. तेथील वैद्यकीय अधिकारी यामिनी आडवे यांनी तातडीने संशयीताच्या घरी भेट दिली. त्यांनी संबधीत दाम्पत्याना व त्यांच्या मुलांना पुणे येथील नायडू रुग्णालयात जाण्यास सांगितले व त्यानसार संबधीत दाम्पत्य रुग्णालयात दाखल केले.
तिथे प्राथमिक तपासणी केली. त्यानुसार त्यांच्यामध्ये कोरोना वायरसचे कोणतीही लक्षणे आढळली नसल्याने त्यांना घरी पाठविल आहे. पुढील तीन ते चार दिवसा काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यानच्या काळात तकाराम बीजे निमित्ताने देहुत आलेले तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात यांनीही त्यांच्या घरी भेट दिली असून जर त्याचे नमुने सकारात्मक आले तर घर व परिसराचे निर्जंतुकीकरण करणार असल्याचे सांगितले. तसेच संबंधित कुटुंबातील आठ लोकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती डॉ. सचिन खरात यांनी दिली.















