- मनसे गटनेता व नगरसेवक सचिन चिखले यांचा पुढाकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मार्च २०२०) :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभे केलेले हिंदवी स्वराज्य यामुळे आज आपण सन्मानाने जगत आहोत. शिवरायांना घडवणारी एक शक्ती म्हणजे जिजाऊ या एक स्त्रीशक्ती चे रुप होत. स्त्री शक्तीचा जागर करण्यासाठी शिवक्रांती हिंदवी सेना महाराष्ट्र राज्य व संस्थेचे अध्यक्ष स्वप्नील धनावडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व मुलीकरीता किल्ले लोहगड गिर्यारोहण स्पर्धा २०२० आयोजित करण्यात आली होती ती उत्साहात पार पडली. त्याच दिवशी कोल्हापूरमध्ये महिला सबलीकरणाचे व्याख्यान आणि कराटे प्रशिक्षण दिले गेले व सातारमध्ये वृध्दआश्रममधिल महिलांना साडीचोळी व खाऊ वाटप केला.
राजमाता जिजाऊ, सावित्रीमाई, रमाई, कल्पना चावला यासारख्या कित्येक महिला यांनी अद्वितीय कामगिरी करून स्त्री कोणत्याही क्षेत्रात कमी नाही हे दाखवून दिले. त्याचमुळे ८ मार्च रोजी जागतिक महिला दिवसाचे औचित्य साधून पुणे जिल्ह्यात प्रथमच महिला व मुली याकरिता किल्ले लोहगड गिर्यारोहण स्पर्धा आयोजित करण्यात आली. शिवरायांचे गडकोट व इतिहास स्त्रियांना समजावा आणि त्यांनी सक्षम व्हावे याकरिता यासाठी ही स्पर्धा आयोजित केली. सकाळी ८ वाजता महिला व मुली असे दोन गट करून ट्रेकिंग स्पर्धेस सुरुवात प्रसिद्ध गिर्यारोहक जनार्दन पानमंद यांच्या उपस्थितीत करण्यास आली. पुण्यातील वेगवेगळ्या भागातून जवळ जवळ ८० महिला व मुली यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने स्पर्धेत रंग भरला. दैनंदिन जीवनातील एक विसावा व आपले अस्तित्व दाखवण्याचा मान या स्पर्धेत महिलांना मिळाला. मुली व महिला असे प्रत्येक गटातून पाच विजयी स्पर्धक काढले महिला गटात प्रथम क्रमांक युगंधरा चौगुले व्दितीय शिवाणी वागरे तृतीय माया बिरामणे चतुर्थ प्रतिभा पाटील पंचम सुनिता बिरामणे व मुली गटात प्रणवी कुशिरे व्दितीय पुजा देवण तृतीय मानसी जाधव चतुर्थ पुजा कुशिरे श्वेता घारणे यांचे प्रथम नंबर काढून त्यांना सन्मानचिन्ह व गौरवपत्र मान्यवरांच्या हस्ते हस्ते देऊन सत्कार करण्यात आला.
या स्पर्धेनंतर उपस्थित मान्यवर जनार्दन पानमंद व माजी सैनिक संतोष निकम यांच्याहस्ते शिव प्रतिमा पूजन व हिंदवी स्वराज्य ध्वजारोहण करण्यात आले. शितल जुनघरे यांनी प्रास्ताविक केले व महिला सबलीकरण याविषयी उमेश पाटिल यांनी मार्गदर्शन केले. शिवक्रांती हिंदवी सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रवीण कदम व खजिनदार सुधीर कांबळे, उपस्थित मान्यवर मार्फत लोहगड येथे गडभ्रमंती करण्यात आली. अल्पोपहार झाल्यावर, गडावर स्वच्छता मोहीम केली, सहभागी महिलांना भेटवस्तू वाटप केले आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
या दरम्यान मनसे शहरप्रमुख व नगरसेवक सचिन चिखले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मनसे विद्यार्थी संघटना श्रध्दा देशमुख, सागर जूनघरे, आनंदा जुनघरे ,रोहिदास बिरामणे ,दयानंद पाटील ,प्रवीण चौगुले ,धनाजी ओले,भरत वागरे, हेमा पाटील , उषा जुनघरे, सारिका शेलार, रोहिणी धनावडे ,छाया शेलार, भारती शेलार ,मंगल धनावडे, जयश्री शेलार, मंजु शर्मा ,सोनाली जाधव ,स्वाती टाककर, श्रध्दा ओलेकर व इतर मान्यवरांचे विशेष सहकार्य लाभले.















