न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मार्च २०२०) :- पुणे महानगर परिवहन महामंडळात दोन वर्षांपासून अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत असलेल्या नयना गुंडे यांची बदली करण्यात आली आहे.
आता त्या यशदा, पुणे येथे उपमहासंचालक पदावर कार्यरत असणार आहेत. गुरुवारी त्या पदभार स्वीकारतील. पीएमपीत असताना गुंडे यांनी महिलांकरिता तेजस्विनी बससेवा आणि ताफ्यात नव्या गाड्या, उत्पन्न वाढीसाठी विविध स्तरांवर प्रयत्न केले आहेत. महिन्यांपूर्वीच त्यांची बदली आदिवासी संशोधन केंद्र येथे करण्यात आली होती. मात्र, ती रद्द करण्यात आली. त्यानंतर त्यांची यशदा येथे उपमहासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.