न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मार्च २०२०) :- सशस्त्र टोळक्याने लूटमार करीत पाच वाहनांची तोडफोड केली. ही घटना बुधवारी (दि. ११ ) पहाटे दोनच्या सुमारास घडली. याप्रकरणी आठजणांना निगडी पोलिसांनी बारा तासाच्या आत अटक केली आहे. मनोज पोपट खरात ( २८ ), संतोष सिद्धू पवार ( २३ ) , करण ज्ञानदेव तिरकर (१९), प्रवीण सोमनाथ कांबळे (१९), सुनील मनोहर डोंगरे (२२), संग्राम विलास बागुल (२५), शुभम गोरखनाथ भिंगारदिवे (२३), अनिकेत चंद्रकांत भोसले (२२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
बुधवारी पहाटे दोन ते अडीचच्या सुमारास आरोपींनी अजंठानगर, कुंदन हुंदाई शोरूमच्या मागे येऊन लूटमार करून एक मोटार आणि चार दुचाकींची तोडफोड केली. आरोपींनी तलवारी आणि कोयत्याने तोडफोड करून सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान केले. त्यानंतर आरोपी इनोव्हा मोटारीतून निघून गेले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक मदतीने आरोपींना संभाजीनगर येथील बहिणाबाई सर्प उद्यान येथील एका जुन्या बंगल्यातून ताब्यात घेतले. पोलिसांनी एका बंगल्यात लपून बसलेल्या आरोपीसह एक कार, तलवार, कोयता असे साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त संदीप विष्णोई, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक आयुक्त रामचंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक गणेश जवादवाड, सहाय्यक निरीक्षक लक्ष्मण सोनवणे, अन्सार शेख, प्रशांत आरदवाड, उपनिरीक्षक महेंद्र आहेर, संदीप ओव्हाळ कर्मचारी किशोर पढेर, मछिद्र घनवट, सतीश ढोले, विलास केकाण, रमेश मावसकर, भूपेंद्र चौधरी, विजय बोडके, राहुल मिसाळ, तुषार गेंजगे, अमोल साळुके, रमेश सूर्यवंशी, अनंता ढाकणे यांच्या पथकाने केली आहे.