न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मार्च २०२०) :- तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अवमानकारक वक्तव्य केले होते. त्याच्या निषेधार्थ २४ एप्रिल २०१४ ला चापेकर चौक चिंचवड येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने मलिकांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन केले होते.
त्या अनुषंगाने १३ कार्यकत्यांवर गुन्हे दाखल झाले होते. यासंदर्भात पिंपरी न्यायालयाने संबंधित कार्यकर्त्यांची शुक्रवारी (दि. १३) निर्दोष मुक्तता केली. संबंधित कार्यकत्यांनी न्यायालयाच्या बाहेर आनंदोत्सव साजरा केला.
स्वीकृत नगरसदस्य मोरेश्वर शेडगे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, माजी नगरसेवक राजू दुर्गे, विशाल वाळुजकर, दीपक नागरगोजे, आदिनाथ माळवे, संजय बडे, सचिन मुंढे, धमेंद्र क्षीरसागर, संकेत वाघमारे, धनंजय शाळीग्राम, सोमनाथ भोंडवे, सचिन शिवले, प्रविण सिंग, वीणा सोनवलकर यांचा यामध्ये समावेश आहे. यावेळी पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.















