न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मार्च २०२०) :- एका तरुणाने शतपावली करणाऱ्या महिलेकडे पाहून अश्लील हावभाव केले. याचा जाब विचारणाऱ्या डॉक्टर महिलेला तरुणाच्या आईने शिवीगाळ केली व चप्पलने मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना १२ मार्च रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास काळेवाडी फाटा परिसरात घडली.
याप्रकरणी, ३६ वर्षीय डॉक्टर महिलेने फिर्याद दिली आहे. त्यावरुन, अदित्य नितीन गारवे ( वय – २० ) व त्याच्या आई विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी डॉक्टर महिला व त्यांची मैत्रीण या शतपावली करीत असताना आरोपी अदित्य गारवे याने त्यांच्याकडे पाहून अश्लील इशारे केले. याबाबत फिर्यादी व त्यांच्या मैत्रिणींनी जाब विचारला असता आरोपी अदित्य याची आई त्यांना शिवीगाळ करत अंगावर धावून गेली.















