न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च २०२०) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनावर उपाय सुचवण्याचं आवाहन केलं आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केलं आहे. यासाठी सरकारकडून ‘COVID – 19 Solution Challenge’चं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आलं आहे. यामध्ये जिंकणाऱ्या व्यक्तीला १ लाखांचं बक्षिस मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये एक लिंक शेअर केली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपण थेट केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकृत पेजवर जातो. यामध्ये यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
सध्या देशभरात तसंच राज्यपातळीवर करोनाचा सामना करण्यासाठी अनेक पावलं उचलली जात आहे. तसंच सरकारनंही नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन कंल आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी करोनावर उपययोजना सुचवण्याचं आवाहन केलं आहे.















