न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मार्च २०२०) :- पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने पेठ क्रमांक १२ येथील आणि वाल्हेकरवाडीमधील गृहप्रकल्पासाठी रेरा कायद्यांतर्गत नोंदणी करण्यासाठी तज्ज्ञ संस्थेची नेमणूक केली आहे.
‘ रेरा ‘ मध्ये संबंधित गृहप्रकल्पाची नोंदणी झाल्यानंतर या गृहप्रकल्पांतील घरांसाठी अर्जवाटप सुरू करण्यात येणार आहे. व्हीडीए असोसिएट्स या संस्थेची रेरा नोंदणीसाठी नेमणूक केली आहे.


















