न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मार्च २०२०) :- देशातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा ४ वर पोहोचला (Corona Death India) आहे. आज (१९) रोजी पंजाबमध्ये एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
यापूर्वी कर्नाटक, दिल्ली आणि महाराष्ट्रात प्रत्येकी एक रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनाबाधितांची (Corona Death India) संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १६७ वर पोहोचली आहे. तर चार जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.













