न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मार्च २०२०) :- पुणे शहरातील पेट्रोल पंप २१ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील. तर, पुणे शहराबाहेर असेलेले पेट्रोल पंप सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत सुरु राहतील, अशी माहिती पेट्रोल डिलर असोसिएशनच्या कार्यकारणीने दिली आहे.
करोनाचा प्रादुर्भाव टाळावा यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. पेट्रोल पंपावर अनेकदा गर्दी होते. ती गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.















