न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मार्च २०२०) :- अत्यावश्यक सेवेतील वाहनांना वाहतुकीबाबत तक्रारी नोंदविण्यासाठी अथवा माहिती मिळविण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे. ९५२९६९१९६६ या क्रमांकावर अत्यावश्यक सेवेतील वाहतूक करणाऱ्यांना संपर्क करता येणार आहे.
रुग्णालय व संबंधित वैद्यकीय आस्थापना, त्यांची उत्पादने व वाटप करणाऱ्या सरकारी, खाजगी आस्थापना उदा. केमिस्ट शॉप, प्रयोगशाळा, दवाखाने, नर्सिंग होम, रुग्णवाहिका, वैद्यकीय उत्पादने विक्री दुकाने, वैद्यकीय उत्पादनांसाठी लागणारी रसायने, रुग्ण सेवेशी संबंधित व्यक्ती, डॉक्टर परिचारिका, रुग्णालयातील कर्मचारी यांना संचारबंदीच्या आदेशातून वगळण्यात आले आहे.
वाहतुकीबाबत काहीही समस्या आल्यास अथवा माहिती हवी असल्यास पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करता येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दिली .













