न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मार्च २०२०) :- करोनामुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांच्या उदरनिर्वाहाचं काय? असा प्रश्न लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यानंतर उपस्थित करण्यात येत होता. यासंदर्भात केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. देशातील ८० कोटी लोकांना प्रति व्यक्तीला महिन्याला सात किलो गहू २ रुपये दरानं देणारं पुरवणार आहे. त्याचबरोबर तांदुळ ३ रुपये दरानं देणार आहे. ही जगातील सर्वात मोठी अन्न सुरक्षा योजना आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.












