न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मार्च २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कोरोना ( कोविड १९ ) या आजारावर उपचारासाठी शहरातील खासगी सात रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे.
यात संत तुकारामनगरमधील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, थेरगावमधील आदित्य बिर्ला हॉस्पिटल, चिंचवडमधील निरामय हॉस्पिटल, निगडी व चिंचवडमधील लोकमान्य हॉस्पिटल, प्राधिकरणातील स्टर्लिंग हॉस्पिटल, स्पाईन रोड, मोशीतील एकार्ड (जुने संत ज्ञानेश्वर हॉस्पिटल) येथे कोरोना – १९ या आजारावरील उपचारासाठी सात रुग्णालयांना राज्य सरकारने निर्देशित केलेल्या समितीमार्फत मान्यता देण्यात आलेली आहे.













