न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मार्च २०२०) :- शहरातील महापालिका रूग्णालये व दवाखान्यांमध्ये बाहारूग्ण विभागात तपासणीसाठी येणा-या रूग्णांचे प्रमाण जास्त असले तरी, तुलनेत सर्दी, ताप, खोकल्याच्या रूग्णांचे प्रमाण मात्र घटले आहे. गेल्या पाच दिवसांत हे चित्र पाहण्यास मिळत आहे. स्वाइन फ्लू आजाराची गेल्या तीन महिन्यांत फक्त दोघांनाच लागण झाली आहे. हा आजारही सध्या नियंत्रणात असल्याचे वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले.
देशभरात सध्या लॉकडाऊन के सुरू आहे. त्याचा परिणाम म्हणजे रस्त्यांवर तुरळक वाहने पाहण्यास त मिळत आहे. नागरिकांनी घरातच बसण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका कमी झाला आहे. त्याशिवाय, लॉकडाऊन लागू होण्यापूर्वीच करोना विषाणूचा संसर्ग होण्याच्या धास्तीने बऱ्याच नागरिकांनी आपले गाव गाठले आहे. पर्यायाने, सर्दी, ताप, खोकला आदींचे रुग्णही घटले आहेत.
२२ तारखेला ९१ जणांनी रूग्णालयांतील बाह्यरुग्ण विभागात तपासणी केली. त्यातील ११ रूग्ण हे सर्दी, ताप, खोकल्याचे होते. २३ आणि २४ तारखेला मात्र. या रुग्णांचे प्रमाण वाढले. २३ तारखेला बाह्य रूग्ण विभागात तपासणी झालेल्या ४ हजार ९५१ जणांपैकी १ हजार १४२ रूग्ण हे सर्दी, ताप, खोकल्याचे होते. तर, २४ ला तपासणी केलेल्या ५ हजार १४ रूग्णांपैकी १ हजार ३१४ रूग्णांना सर्दी, ताप, खोकला झाला होता. बुधवारी ( दि. २५ ) फक्त ९ रूग्ण हे होते. तर, गुरुवारी ( दि. २६ ) एकूण तपासणी केलेल्या ३ हजार ५९२ रुग्णांपैकी ७४५ जणांना सर्दी, ताप, खोकला असल्याचे आढळले.


















