न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मार्च २०२०) :- भारतीय जैन संघटना आणि जागृती प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विद्यमाने (दि. २८) रोजी निगडी प्राधिकरण येथे रक्तदान शिबिरचे आयोजन केले होते. या शिबिरामध्ये ३२ सजग नागरिकांनी social distancing चे पालन करून रक्तदान केले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन येत्या काळात देशात रक्ताचा तुटवडा भासू शकतो. हिच बाब लक्षात घेऊन भारतीय जैन संघटनेने सजगता दाखवुन पिंपरी चिंचवड शहरात विविध ठिकाणी ४ रक्तदान शिबिरे आयोजित केली होती. संघटनेचे सदस्य आदित्य नहार यांच्या पुढाकाराने प्रधिकरण येथे हे शिबिर आयोजित केले होते. यात एकञित १८१ रक्त पिशवींचा साठा केला गेला.
संघटनेचे अध्यक्ष विरेश छाजेड यांनी सर्व रक्तदात्यांचे मनःपुर्वक आभार मानले. भारतीय जैन संघटनेचे शुभम कटारिया, संदेश गादिया इ. तसेच जागृती प्रतिष्ठानचे पियुष नहार, सुशिल इनामदार, नयन नहार, सचिन नावंदर, अनंत इनामदार आदींनी विशेष सहकार्य केले. येत्या १५ एप्रिलपर्यंत शहरातील विविध स्तरावर याच प्रकारे रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा संघटनेचा मानस आहे.













