न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ एप्रिल २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येत आज दोन ने वाढ होऊन दाखल झालेल्या रुग्णाची संख्या तीन झाली आहे. आतापर्यंत पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकुण १४ रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आलेले आहेत. तर होम क्वारंटाईन नागरिकांची १५८० झाली आहे, अशी माहिती महापौर माई ढोरे यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात दाखल असलेला आणखी एक रुग्ण ‘कोरोनामुक्त’ झाला आहे. या रुग्णाची दुसरी चाचणी आज (गुरुवारी) निगेटीव्ह आली आहे. त्यामुळे पहिल्या १२ पैकी ११ रुग्ण ठणठणीत झाले आहेत. शहरात आता पहिल्या बारापैकी १ आणि दिल्लीतून आलेले, पॉझिटीव्ह असलेले दोन असे तीन रुग्ण कोरोनाग्रस्त आहेत. आज निगेटिव्ह अहवाल आलेला हा रुग्ण फिलिपिन्स येथून प्रवास करुन शहरात आला होता.
दिल्ली येथिल निजामुद्दीन परिसरातील उद्रेकाच्या अनुषंगाने तबलीग जमातीच्या बंगलेवाली मशिद, नवी दिल्ली या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरीकामधील २३ संशयीत व नातेवाईक असे २८ संशयीत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी दोन संशयीतांचे स्वब पॉझिटीव्ह आले आहेत. उर्वरित २६ रुग्णाचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झालेले आहेत. सद्यस्थितीत सर्व रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याचेवर महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात आयसोलेशन कक्षामध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती महापौर यांनी दिली.
पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे घरात विलगीकरणात असणाऱ्या नागरिकांची संख्या १५८० असून त्या सर्वांनी किमान १४ दिवसासांठी आवश्यकता भासल्यास पुढील २८ दिवसापर्यत घरातच थांबण्याच्या सूचनाचे पालन करावे. तसेच सुचनांचे उल्लंघन करणाऱ्या होम क्वारंटाईनमधील नागरिकावर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
तसेच राज्यभरात ८१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातली करोनाग्रस्तांची संख्या थेट ४१६ झाली आहे. पुण्यात सहा, पिंपरी चिंचवडमध्ये तीन, मुंबईत ५७, अहमदनगरमध्ये नऊ, ठाण्यात पाच, बुलढाण्यात १ असे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या ४१६ वर गेली आहे. महाराष्ट्राच्या काळजीत भर घालणारी ही बातमी ठरली आहे.












