न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ एप्रिल २०२०) :- गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस सांगवी परिसरात गस्त घालत असताना पिंपळे निलख येथील वाकवस्ती येथे नदीच्या बाजूला सार्वजनिक मोकळ्या जागेत एकाने ताडी या दारूचा साठा केला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून ३५ हजार रुपये किमतीची ७०० लिटर ताडी जप्त केली.
याप्रकरणी एकनाथ भंडारी (वय २९ रा. पिंपळे निलख, पुणे) याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम ६५ (फ) आणि भारतीय दंड विधान कलम १८८ नुसार सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.












