न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात गुरुवारी एका महिलेला कोरोनाची लग्न झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तिच्या संपर्कातील हाय रिस्क व्यक्तींना महापालिकेने रुग्णालयात पाठविले होते.
पुण्यातून शहरात आलेल्या या कोरोनाबाधित महिलेच्या ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मध्ये एका पोलिसासह दोघांना देखील महापालिका रुग्णालयात तपासणीसाठी दाखल केले होते. या सर्वांचे घशांचे नमुने पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविण्यात आले होते.
त्यामुळे शहरात घबराट पसरली होती. आज त्या महिलेच्या ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील पोलिसाचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. त्याच्यासह इतर संशयित ४९ जणांचे देखील रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. दरम्यान, शहरात कोरोनाचे १४ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत.


















