न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३०. जुलै. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात गुरुवारी (दि. ३० जुलै) रोजी ८८६ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील १६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
यात (पुरूष वय ४२) चिखली, (पुरूष वय ५१) चिखली, (पुरूष वय ६६) चिखली, (पुरूष वय ५७) मोरवाडी, (पुरूष वय ६५) काळेवाडी, (पुरूष वय ६२) काळेवाडी, (पुरूष वय ३६) थेरगाव, (पुरूष वय ७४) सं.तु.नगर, पिंपरी, (पुरूष वय ७०) मोशी, (पुरूष वय ७५) नेहरूनगर, (पुरूष वय ४१) रूपीनगर, (पुरूष वय ५५), विद्यानगर, चिंचवड, (स्त्री वय ५५) पिंपरी, (स्त्री वय ७५) पिंपळे गुरव, (स्त्री वय ७५) चिंचवडगाव, (स्त्री वय ४१) निगडी यांचा समावेश आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २०३१७ वर पोहोचली आहे. महापालिका रुग्णालयात ३३०३ रुग्ण उपचार घेत आहे. तर, आजपर्यंत शहरातील एकूण ३२७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १२४४५ वर पोहोचली आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा सुरु झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.










