न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४. ऑगस्ट. २०२०) :- केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात सलग तीन वर्षे भाग घेणाऱ्या आणि गतवर्षी देशात ४० व्या स्थानावर असलेल्या देहुरोड कॅटोन्मेंट बोर्डाने यंदा सामूहिक प्रयत्न केले, तसेच त्रुटी दूर करीत राज्यात प्रथम तर देशात आठवा पुरस्कार मिळवल्याची माहिती बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्वच्छ सर्वेक्षणात कँटोन्मेंटला मिळालेल्या पुरस्काराची माहिती यंदा स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये देहुरोड कॅटोन्मेंट बोर्डाला ६ हजार गुणांपैकी २९४२.९८ गुण मिळाले आहेत.
गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी १२०० गुण अधिक मिळाले असून, क्रमवारीतील ४० व्या स्थानावरून ८ व्या स्थानावर व राज्यात शेवटच्या स्थानावरून पहिल्या स्थानावर झेप घेतल्याने यात संबंधित यंत्रणेने देशातील ‘ फास्टेस्ट मूवर ‘ कँटोन्मेंट बोर्डाचा प्रथम पुरस्कार देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाला दिला असल्याचे सांगण्यात आले.















