- सुखद… आज सहाशेपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज सोमवारी (दि. २४ ऑगस्ट) रोजी ८६९ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा २६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
यात चिखली (पुरुष ६३ वर्षे), दापोडी (स्त्री ५१ वर्षे), संत तुकाराम नगर पिंपरी (पुरुष ५८ वर्षे), चिंचवडगांव ( स्त्री ६२ वर्षे), भोसरी (पुरुष ७० वर्षे, पुरुष ५७ वर्षे, पुरुष ७० वर्षे, पुरुष ६१ वर्षे), रावेत (पुरुष ६२ वर्षे), वाकड (पुरुष ७३ वर्षे), पिंपरी (पुरुष ५८ वर्षे), नेहरुनगर (पुरुष ७४ वर्षे), बिजलीनगर (पुरुष ४९ वर्ष), खराळवाडी (पुरुष ३३ वर्षे), अजमेरा (पुरुष ८५ वर्षे), शाहूनगर (पुरुष ५५ वर्षे), निगडी (स्त्री ७६ वर्षे), च-होली (स्त्री ८० वर्षे), देहुरोड (पुरुष ५८ वर्षे, पुरुष ५३ वर्षे) जुन्नर (पुरुष ७० वर्षे), दौंड (पुरुष ५५ वर्षे), लोणावळा (पुरुष ६३ वर्षे), कर्वेनगर (पुरुष ८३ वर्षे), तळेगांव ( पुरष ६१ वर्षे), देहुगांव ( स्त्री १९ वर्षे) येथील रुग्णांचा समावेश आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ४२५१७ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील एकूण ७९४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २८५७५ वर पोहोचली आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं. म. न. पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.















