न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ सप्टेंबर २०२०) :- अनेकांच्या हातचे काम गेले खायचे काय, जगायचे कसे अशी परिस्थिती निर्माण झाली. या संकटातून बाहेर काढण्यासाठी महिला कामगारांना पंधरा हजारांचे आर्थिक साह्य मिळावे म्हणून कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे शहरातील मोलकरीण यांच्याकडून पोस्टकार्ड सह्यांची मोहीम घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज २५०० पत्रे आकुर्ड़ी व पिंपरी येथील टपाल पेटीत टाकुन पाठवण्यात आली आहेत. एक आठवडाभर हा उपक्रम चालणार आहे.
यावेळी कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, महिला विभागाच्या माधुरी जलमूलवार, राणी माने, कमल तोरणे, विजया पाटिल , मनिषा पवार, कविता म्हस्के ,बशीरा शेख, शकिला शेख, अशा दुनधव ,अंजना कांबळे ,जयश्री वाळुंज , सुवर्णा शेलार ,रत्ना पाटील वंदना कारंडे आदीसह घरेलू कामगार उपस्थित होते
टाळेबंदीतूंन हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी म्हणून अनेकांच्या हाताला काम मिळावे. त्यांचा टाळेबंदीतील पगार मिळावा यासाठी कष्टकरी संघर्ष महासंघ प्रयत्नशील आसुन त्यातूनच अनेकाना लाभ व काम मिळाले आहे. त्यासाठी मोफत कोरोना टेस्ट करुन कामास सूरुवात केली आहे.














