न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ सप्टेंबर २०२०) :- भोसरी येथील शासकीय स्वॅब कलेक्शन सेंटर येथे एक वयोवृध्द पुरुष अतिशय चिंताजनक परिस्थितीत कोविड चाचणी साठी आले होते. त्यांची तब्येत इतकी खालावली होती की ते रिक्क्षातून खालीसुद्धा उतरू शकत नव्हते.
लॅब रिपोर्ट शिवाय त्यांना कुठल्याही रुग्णालयात भरती होण्यास अडचण होत होती. नाजूक आर्थिक परिस्थितीमुळे ते खाजगी लॅबमधून चाचणी करू शकत नव्हते. अशा परिस्थितीत शासकीय चाचणीशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नव्हता. परंतू, तब्येत जास्तच खालावल्यामुळे ते वाहनाच्या खालीसुद्धा उतरु शकत नव्हते.
सदर परस्थिती समजल्यानंतर डाॅक्टर एैश्वर्या मनिष जाधव यांनी जेष्ठ वैद्यकिय अधिकारी डॉ. शैलजा भावसार व डाॅ लक्क्ष्मीकांत अत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली, पारिचारिका स्मिता यांसोबत रस्त्यावर जाऊन रुग्णाचे स्वॅब घेतले.














