न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ सप्टेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज गुरुवारी (दि. १७ सप्टेंबर) रोजी १११३ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा ३३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ११९९ जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.
यात भोसरी (पुरुष ४६ वर्षे, पुरुष ७२ वर्षे, पुरुष ५२ वर्षे), पिंपरी (पुरुष ६७ वर्षे), किवळे (स्त्री ५७ वर्षे), आकुर्डी (पुरुष ७६ वर्षे), निगडी (स्त्री ७६ वर्षे, पुरुष ७३ वर्षे), चिखली (पुरुष ५१वर्षे, स्त्री ७५वर्षे), रावेत (पुरुष ६६ वर्षे), पुनावळे (स्त्री ५५ वर्षे), थेरगाव (पुरुष ५५ वर्षे, स्त्री ६८ वर्षे), पिंपळे गुरव (पुरुष ७० वर्षे), भीमनगर (स्त्री ४८ वर्षे), काळेवाडी (पुरुष ७९ वर्षे), सांगवी (पुरुष ६३ वर्षे), वानवडी (पुरुष ८७ वर्षे), गंगापुर पुणे (पुरुष ७७ वर्षे), कर्वेनगर (पुरुष ६७ वर्षे, पुरुष ७१ वर्षे, पुरुष ५६ वर्षे), जुन्नर (पुरुष ४९ वर्षे, पुरुष ६० वर्षे, पुरुष ४० वर्षे), बावधन (स्त्री ५३ वर्षे), हडपसर (पुरुष ५२ वर्षे), कात्रज (पुरुष ३३ वर्षे), लातुर (पुरुष ७५ वर्षे), खेड (पुरुष ६५ वर्षे), आंबेगाव (स्त्री ७० वर्षे), येरवडा (स्त्री ५८ वर्षे) येथील रुग्णांचा समावेश आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ६७५९६ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ५७०५२ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १०९५ जणांचा मृत्यू झालेला आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं. म. न. पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.














