न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०२०) :- सासूला चपलेने मारहाण करीत तिचा विनयभंग करणाऱ्या जावयावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. १९) दुपारी साडेचारच्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडली.
या प्रकरणी ३७ वर्षीय जावयाला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सासू आणि तिच्या जावयात मागील काही दिवसांपासून भांडण सुरू होते. त्यावरून जावयाने शनिवारी सासरवाडीत येऊन सासूला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. त्यानंतर सासूला चपलेने मारले. तसेच अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत जावयावर मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.