न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०२०) :- महापालिकेतील समाविष्ट गावांपैकी प्रमुख असणाऱ्या च-होलीमध्ये कोरोना महामारीची साखळी तोडण्यासाठी गुरुवार (दि. २४) ते शनिवार (दि. २६) असे तीन दिवस अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व व्यवहार स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
मार्च महिन्यापासून पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. चऱ्होली व परिसरातील उपनगरांमध्येही मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. अनेकांना यामध्ये आपले जीव गमवावे लागल्यामुळे च-होलीतील ग्रामस्थांनी कोरोनाचे रुग्ण एकत्र येत या महामारीची साखळी तोडण्यासाठी स्वयंस्फूर्तीने निर्णय घेतला आहे.
त्यादृष्टीने सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र येत गावांमध्ये फिरून दुकानदार, नागरिकांना घराबाहेर पडू नका, यासाठी आवाहन करताना दिसत आहेत च-होलीमध्ये मोठे गृहप्रकल्प झाल्यामुळे याठिकाणी नागरीकरण वाढले आहे. त्यामुळे च-होली आणि त्याच्या बारा वाड्यांवर मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडले आहेत. कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. तर ज्यांना कोरोना होऊन गेला आहे ते प्लाझ्मा दान करण्यासाठी ही पुढे येत चऱ्होलीतील कोरोनातून बरे झालेल्या ग्रामस्थांनी शहरातील इतर प्रभागातील नागरिकांसमोर आदर्श घालून दिला आहे. मोठ्या प्रमाणावर प्लाझ्मा दान करण्यासाठ च-होलीकरसमोर आले आहेत. त्यामुळे सामाजिकतेचे भान ठेवत चऱ्होलीकरांनी जो स्वयंस्फूर्तीने तीन दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे त्याला निश्चित ग्रामस्थ साथ देणार असा विश्वास च-होलीकरांना आहे.