न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ सप्टेंबर २०२०) :- बेकायदेशीरपणे फ्लॅटचा ताबा घेऊन बांधकाम व्यावसायिकासोबत जागेचा विकसन करारनामा व कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यारपत्र केलेले असताना तीच जागा बक्षीसपत्राने दुसऱ्याच्या नावावर करून बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक केली. याबाबत पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
विलास गोपाल डोंगरे, वंदना विलास डोंगरे, अमेय विलास डोंगरे, पल्लवी सुयोग डोंगरे, सुयोग विलास डोंगरे (सर्व रा. डोंबिवली पूर्व, ठाणे. सध्या रा. नावकर बिल्डकॉन, ज्ञानदा कॉलनी, ताथवडे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी अतुल पोपटलाल धोका (वय ५४, रा. चिंचवड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


















