न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ सप्टेंबर २०२०) :- रावण टोळीतील सराईत गुन्हेगारास खंडणी आणि दरोडा विरोधी पथकाने देशी पिस्तूल आणि दोन जिवंत कडतुसासह अटक केली आहे. कुणाल चंद्रसेन गायकवाड (वय २२, रा. अजंठानगर, थरमॅक्स चौक, चिंचवड) असे आरोपीचे नाव आहे.
शहरातील फरारी गुन्हेगारांचा शोध घेत असताना निशिकांत काळे आणि आशिष बोटके यांना एक व्यक्ती आपल्या मित्राला भेटायला वाल्हेकरवाडी येथील हॉटेल पंजाबी स्ट्रीटवर येणार असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली होती. तसेच, त्या इसमाकडे पिस्तूल असल्याचे समजले होते. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला.
संशयित व्यक्ती आल्यानंतर दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने आरोपीस पकडले. त्याची झडती घेतली असता कंबरेस पिस्तूल अडकवलेले आढळले. खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, उपनिरीक्षक अनिकेत हिवरकर, महेश खांडे, उमेश पुलगम, निशांत काळे, आशिष बोटके आणि राजेश कौशल्ये यांच्या पथकाने ही कारवाई केली.