न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ सप्टेंबर २०२०) :- जुन्या भांडणातून दोघांनी एका तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू टाकून जखमी केले. करण अनिल सुकाळे (वय १९, रा. बाणेर चाळ, थेरगाव,) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
या प्रकरणी आशिष पवार आणि त्याच्या मित्रावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना २४ सप्टेंबर रोजी बाणेर रस्त्यावरील थेरगाव चौकात सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. सुकाळे नाष्टा करण्यासाठी हॉटेलमध्ये थांबले होते. त्यावेळी वादातून पवार याने सुकाळे यांना शिवीगाळ करीत बाजूला पडलेला सिमेंटचा गट्टू डोक्यात घातल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.