न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ ऑक्टोबर २०२०) :- चिंचवड स्टेशन येथील वृत्तपत्र विक्रेते रामचंद्र रंगनाथ दळवी (वय ७८) यांचे शुक्रवारी (दि. २) रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
रामचंद्र दळवी यांनी सुरुवातीला गरवारे कंपनीत नोकरी केली. निवृत्तीनंतर वृत्तपत्र विक्रीचे ते काम करत होते. यापूर्वी त्यांना पॅरेलेसीसचा ॲटक आला होता. मागील तीन वर्षांपासून ते घरीच होते.
संत तुकारामनगर येथील वायसीएम रुग्णालयात त्यांच्यवर उपचार सुरु होते. त्यांच्या पार्थिवावर चिंचवड, लिंक रोड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘एमपीसी न्यूज’, ‘अंतरंग’चे कर्मचारी अनिल दळवी यांचे ते वडील होत.


















