न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ ऑक्टोबर २०२०) :- महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त व कै. काशिनाथ बनसोडे यांच्या स्मृतीपित्यर्थ वाल्हेकरवाडीत शुक्रवारी (दि. २) रोजी कांचन मुव्हीज परिवाराच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पुणे पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदिप धुमाळ, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष प्रदिप धुमाळ, सामाजिक कार्यकर्ते मुस्ताक पानसरे, डॉ. रामटेके, विनोद नेवाळे (येवले), अतुल वाघ, सुरेश बनसोडे, अनील गायकवाड, संयोजक सुरेश सकपाळ, दिपक पाटील आदी उपस्थित होते.
सर्वप्रथम विनीत गावडे, चिदांनद कारले, कुणाल कोडें, प्रमोद मळाले यांनी रक्तदानाला सुरुवात केली. रक्तदान शिबीरात प्रिया वासवाणी हिने थँलेसीमीया रोगाबद्दल जनजाग्रुती केली. प्रत्येक रक्तदात्यास सँनिटायझर, मास्क, तुळशीचे रोप देऊन मान्यवराच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले, अशी माहिती आयोजक प्रविण बबनराव घरडे यांनी दिली.


















