न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑक्टोबर २०२०) :- चोरट्याने सोळा चाकी ट्रक मालासह पळवून नेल्याची घटना चिखलीमध्ये उघडकीस आली आहे. हरगुडे वस्ती चिखली येथून १२ ऑक्टोबरच्या सायंकाळ पासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे पर्यंत मालवाहू ट्रक घरापासून चोरीस गेला.
समाधान नवनाथ खरात (वय ३०, रा. हरगुडे वस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. खरात यांनी त्यांच्या राहत्या घराजवळील संजयशेठ नेवाळे यांच्या घरासमोर टाटा कंपनीचा सोळा चाकी ट्रक लावला होता. त्यात ८ लाख ७८ हजार ७७७ रुपयांचे २३ लोखंडी स्टील होते. त्यासह ट्रक नेल्याचे फर्यादीत म्हटले आहे.
















