न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑक्टोबर २०२०) :- रोपवाटिकेतून पाच चंदनाची झाडे चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना मध्यवर्ती रोप वाटिका, प्राधिकरण, येथे गुरुवारी (दि. १५) पहाटे दोन वाजताच्या सुमारास घडली. गणपत नारायण खुळे (वय ५८, रा. जय मल्हार कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी शुक्रवारी (दि. १६) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी खुळे हे प्राधिकरण पेठ क्रमांक २७ मधील मध्यवर्ती रोप वाटिकेत नोकरी करतात. गुरुवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास चोरटयांनी मध्यवर्ती रोप वाटिकेतील चार हजार रुपये किमातीची पाच चंदनाची झाडे चारून नेली.
















