न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑक्टोबर २०२०) :- कामावर असलेल्या महिलेचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. ही घटना पिंपरी येथे १७ सप्टेंबर रोजी घडली. वसंत हनुमंत बुचडे ( वय ५१, रा. मु.पो. मारूंजी, ता. मुळशी, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत ४० वर्षीय महिलेने शुक्रवारी (दि. १६) याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला १७ सप्टेंबर रोजी पिंपरी येथे कामावर असताना आरोपी बुचडे याने तिचा विनयभंग केला. पोलीस उपनिरीक्षक कामठे याबाबत अधिक तपास करीत आहेत.
















