न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑक्टोबर २०२०) :- मोबाइल न दिल्याचा राग मनात धरून एकाला दगडाला मारहाण करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (दि. १६) रात्री सव्वा नऊच्या सुमारास पिंपळे निलख येथे घडली. हरूण बासू शेख असे जखमीचे नाव आहे.
याप्रकरणी त्यांचा मुलगा फिरोज हरुण शेख (वय २५, रा. पंचशील नगर, पिंपळे निलख) यांनी शुक्रवारी (दि. १६) सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्वप्निल पवार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी फिरोज यांचे वडील हारुण हे भेळीच्या गाडीवर काम करतात.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी आरोपी स्वप्नील याने हरुण यांच्याकडे मोबाइल मागितला होता. त्यावेळी हरुण यांनी त्याला मोबाइल दिला नव्हता. याचा राग मनात धरून स्वप्निल याने शुक्रवारी त्यांना दगडाने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
















