न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ डिसें.) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीची पाक्षिक सभा आज बुधवार (दि. ५) रोजी सभापती स्वीनल म्हेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
पिंपरी-चिंचवड महापालिका सुमारे दहा वर्षांपूर्वीपासून पवनाथडी जत्रा भरविते. महापालिका हद्दीतील महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्कांची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने महापालिकेतर्फे महिला व बाल कल्याण योजने अंतर्गत पवनाथडी जत्रेचे आयोजन केले जाते. यंदाच्या १२ व्या वर्षी पवनाथडी जत्रा भरविण्याच्या ठिकाणीवरुन तत्कालीन सत्ताधा-यांमध्ये वादावाद झाली.
महिला व बालकल्याण समितीच्या आज झालेल्या सभेत अगोदर भोसरीगाव जत्रा मैदान येथे जानेवारी २०१९ च्या पहिल्या किंवा दुस-या आठवड्यात जत्रा भरविण्याबाबतचा ठराव केला होता. त्यानंतर पुन्हा सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानात फेब्रुवारी २०१९ च्या पहिल्या अथवा दुस-या आठवड्यामध्ये जत्रा भरविण्याचा ठराव केला. त्यामुळे जत्रेच्या ठिकाणावरुन संभ्रामवस्था कायम आहे. तसेच जत्रेला वादाची पंरपरा देखील कायम राहिली आहे.