न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑक्टोबर २०२०) :- महापालिकेच्या मोशी कचरा डेपो पेचील ‘ वेस्ट टू एनर्जी ( कचऱ्यापासून वीजनिर्मिती) प्रकल्प तीनपेक्षा अधिक वर्षांपासून रखडला आहे. असे असले तरी, या प्रकल्पाच्या सल्लागारास ४ लाख ६५ हजार रूपये शुल्क अदा केले जाणार आहे.
महापालिकेच्या पर्यावरण विभागाने हा प्रकल्प राबविला आहे. मंजुरी मिळून ३ वर्षे लोटले तरी, अद्याप या प्रकल्पातून एक युनिटही वीजनिर्मिती झालेली नाही. प्रकल्प नावीन्यपूर्ण असल्याने त्यात तांत्रिक व आर्थिक त्रुटी राहू नये, म्हणून त्यांचा सल्ला घेण्यात आल्याचा दावा पर्यावरण विभागाने केला आहे.
त्यासाठी ६ वेगवेगळ्या सल्लागारांना एकूण ४ लाख ६५ हजार रुपये शुल्क अदा केले जाणार आहे. प्रकल्प पूर्ण क्षमतेने मुदतीमध्ये कार्यान्वित झालेले नाहीत. प्रकल्प स्थितीत आहेत. असे असताना सल्लागारांना लाखांचे शुल्क अदा केले जात असल्याने शंका उपस्थित केली जात आहे.