न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज बुधवारी (दि. २१ ऑक्टोबर) रोजी २४४ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा ०३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १९९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे ०१ पुरुष भोसरी (५७ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबहेरील रहीवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०२ पुरुष औरंगाबाद (७० वर्षे), मावळ (५२ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षण मोहिम (दुसरा टप्पा) अंतर्गत आज अखेर १३१४ पथकांव्दारे १५२९८१९ लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यामध्ये ३५९२ व्यक्तींच्या घशातील नमुन्यांची तपासणी केली असता १२१ व्यक्ती कोविड पॉझिटीव्ह आढळून आलेल्या आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ८६११४ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ८२३१७ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १४९३ जणांचा मृत्यू झालेला आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं. म. न. पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.