न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑक्टोबर २०२०) :- स्वच्छ महाराष्ट्र/ भारतअभियान (नागरी) अंतर्गत पिंपरी -चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रामध्ये स्वच्छ सर्वेक्षण २०२१ सुरु झालेले आहे. या अभियानामध्ये नागरीकांचा व समाजातील सर्व घटकांचा व्यापक स्वरुपात सहभाग असणे तसेच माहिती, शिक्षण व संवादाद्वारे वर्तनामध्ये बदल घडविणे हा या सर्वेक्षणाचा प्रमुख हेतु आहे.
त्या अनुषंगाने नवीन कंपनी, उद्योजक, औदयोगिक /धार्मिक / स्वयंसेवी संस्था यांनी एप्रिल २०२० पासुन घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टीकबंदी, कोविड १९ इत्यादी स्वच्छता विषयक बाबींबाबत महत्वपुर्ण कामकाज केले आहे किंवा याबाबत वेगळे उत्पादन किंवा सेवा विकसित केली आहे, त्यांना गौरविण्यात येणार आहे.
संबंधितांनी आपली नावे, पत्ता, संपर्क क्रमांक, कामकाज करतानाचे फोटो तसेच कामकाजाकरीता थोडक्यात माहिती पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या [email protected] या ईमेल आयडीवर १५ नोव्हेंबर २०२० पर्यंत पाठविण्यात यावी. शहरातील जास्तीत जास्त नवीन कंपनी, उदयोजक, औदयोगिक /धार्मिक / स्वयंसेवी संस्था यांनी सहभाग नोंदवुन पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्यास महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.