- आ. जगतापांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागात विकासकामांचा धुमधडाका – नगरसेविका ममता गायकवाड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने वाकड परिसरात मोठ्या प्रमाणात विकासकामे प्रगतीपथावर आहेत. या चालू विकासकामांचा स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा व नगरसेविका ममता विनायक गायकवाड यांनी पाहणी दौरा करून नागरिकांना होणाऱ्या समस्या, सद्यस्थितीत व कामांच्या प्रगतीबाबत माहिती घेतली.
यामध्ये कावेरी सब – वे ते शौर्य हॉटेल चौक रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण करणे, काळेवाडी फाटा ते छत्रपती चौक रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण करणे, छत्रपती चौक ते अ उत्कर्ष चौक रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करणे व वाकड परिसरात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र करणे आदी कामांचा समावेश आहे. ही सर्व कामे नगरसेविका ममता गायकवाड स्थायी समितीच्या अध्यक्षा असताना त्यांनी पाठपुरावा करून मंजूर करून घेतलेली होती.
या संदर्भात बोलताना नगरसेविका गायकवाड म्हणाल्या कि, सद्यस्थितीत वाकड परिसरात २०० कोटींपेक्षा अधिक निधीची विकासकामे प्रगतीपथावर आहेत. ही सर्व विकासकामे स्थायी समितीच्या अध्यक्ष पदाच्या काळात आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करून मंजूर करण्यात आलेली होती. ही कामे लवकरात लवकर पूर्ण पिंपरी करण्यासंदर्भातील सूचना देखील संबंधित विभागास देण्यात आलेल्या होत्या. त्याअनुषंगाने आजचा पाहणी दौरा करण्यात आला. ही कामे चालू असताना नागरिकांना छोट्या – मोठ्या प्रमाणात समस्या येत आहेत. त्या अनुषंगाने ठेकेदारास आज सूचना देण्यात आल्या आहेत.
आम्ही निवडणुकीच्या काळात नागरिकांना विकासकामांबाबत जो शब्द दिलेला होता, तो आज पूर्ण होताना दिसत आहे. त्याबद्दल मनस्वी समाधान वाटत आहे. या परिसरातील नागरिकांना लवकरच ही सर्व विकासकामे पाहायला व अनुभवायला मिळतील. पिंपरी चिंचवड शहरात एक विकसित प्रभाग म्हणून हा परिसर ओळखला जाईल.
– मा. ममता गायकवाड (विद्यमान नगरसेविका व माजी सभापती स्थायी समिती)…