न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२. नोव्हेंबर २०२०) :- सुरळीत कामकाजासाठी दोन अतिरिक्त आयुक्तांकडील काही विभाग बदलण्यात आले आहेत. तसे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नुकतेच दिले.
अतिरिक्त आयुक्त (क्रमांक एक) संतोष पाटील यांच्याकडे प्रशासन, कायदा व झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन हे विभाग ठेवण्यात आले आहेत. तर, अतिरिक्त आयुक्त (क्रमांक दोन) अजित पवार यांच्याकडे पाणीपुरवठा व जलनिस्सारण, बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण आणि पर्यावरण अभियांत्रिकी या विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
पाटील यांच्याकडे स्थापत्य मुख्यालय, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग, वैद्यकीय विभाग, वायसीएम, विद्युत मुख्य कार्यालय, आपत्ती व्यवस्थापन, नागरवस्ती विकास योजना, उद्यान व वृक्षसंवर्धन, बीएसयुपी, ईएब्ल्यूएस, बीआरटीएसची जबाबदारी कायम आहे. यांच्याकडे आरोग्य, निवडणूक व जनगणना, पशुवैद्यकीय, करसंकलन, आकाशचिन्ह व परवाना, एलबीटी, मध्यवर्ती भांडार, भूमि व जिंदगी, सार्वजनिक वाचनालय व प्रेक्षागृह या विभागाची जबबादारी कायम आहे.
तर, अतिरिक्त आयुक्त ( क्रमांक तीन ) प्रवीण तुपे यांच्याकडे क्रीडा, सुरक्षा, कामगार कल्याण, कार्यशाळा, अभिलेख, माहिती व जनसंपर्क, मोरवाडी व कासारवाडी आयटीआय या विभागाची जबाबदारी आहे.
















