- शनिवारी शहरात चार दुचाकींची चोरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२. नोव्हेंबर २०२०) :- वाहन चोरटे सुसाट असून शहरात वाहन चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. दिघी, चिंचवड, निगडी आणि हिंजवडी परिसरातून अज्ञात चोरट्यांनी चार दुचाकी चोरून नेल्या. याबाबत शनिवारी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस आयुक्त बदलले तरी वाहनचोरीचे सत्र काही थांबलेले नाही. वाहन चोरीच्या पहिल्या घटनेत प्रफुल मनोहर सोनवणे (वय ३०, रा. देहूफाटा, आळंदी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची १० हजार रुपये किमतीची दुचाकी १९ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर – दरम्यान डुडुळगाव फाट्यावरून चोरून नेली.
दुसऱ्या घटनेत नितीन राजेश सोनवणे (वय २८, रा. चिंचवडगाव) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची ४० हजार रुपये किमतीची दुचाकी १७ ऑक्टोबर रोजी रात्री साडेबारा ते पहाटे पाचच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चिंचवडे चाळ, चिंचवडगाव येथून चोरून नेली. तिसऱ्या घटनेत अमर वसंत गोखले (वय ३१, रा. आकुर्डी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गोखले यांची ७५ हजार रुपये किमतीची दुचाकी शनिवारी (दि. ३१) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास संत तुकाराम गार्डन, प्राधिकरण येथून चोरून नेली.
चौथ्या घटनेत नामदेव सोपान सुतार (वय ५०, रा. सुतारवाडी, ता. हवेली) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुतार यांची २५ हजार रुपये किमतीची ही दुचाकी शुक्रवारी (दि. ३०) रात्री ननावरे वस्ती येथून चोरुन नेली.
















