न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ नोव्हेंबर २०२०) :- राज्यात विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक होत आहे. यापैकी राज्यातील तीन पदवीधर व एका शिक्षक मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपानं चार जणांची नावं जाहीर केली आहे. यात पुणे पदवीधर मतदारसंघातून संग्राम देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
राज्यातील ५ पदवीधर मतदारसंघांच्या निडणुकांसाठी १ डिसेंबरला मतदान होणार असून, आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकांचे निकाल ३ डिसेंबरला जाहीर होणार आहेत. यामध्ये तीन जागा पदवीधर मतदारसंघ तर २ जागा शिक्षक मतदारसंघाच्या आहेत. या पाच जागांसाठी पुढील महिन्यात (डिसेंबर) १ तारखेला मतदान होणार आहे. यापैकी चार जागांवर भाजपाकडून उमेदवारा जाहीर करण्यात आले आहेत.
भाजपाने पुणे मतदारसंघातून संग्राम देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. तर औरंगाबादमधून शिरीष बोराळकर, नागपूर पदवीधर मतदारसंघातून संदीप जोशी व अमरावती शिक्षक मतदारसंघातून नितीन रामदास धांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.


















