- रविवारी १२३ जणांना कोरोनाची बाधा; १०१ जण झाले कोरोनमुक्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ नोव्हेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात रविवारी (दि. ०८ नोव्हेंबर) रोजी १२३ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील व हद्दीबाहेरील एकाचाही रविवारी कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १०१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ८८८०२ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ८५४७५ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १५४६ जणांचा मृत्यू झालेला आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.


















