न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ नोव्हेंबर २०२०) :- पिंपरीतील डॉ. डी. वाय पाटील आयुर्वेद रुग्णालयात आयुष मंत्रालय नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार पाचवा राष्ट्रीय आयुर्वेद दिन दिनांक १३ नोव्हेंबर शुक्रवार रोजी साजरा करण्यात येणार आहे. “आयुर्वेद फॉर कोविड- १९ ” या संकल्पनेवर आधारित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी शिबीर (इम्युनिटी कॅम्प) कोविड नंतरच्या आरोग्य विषयक समस्यांचे शिबीर (पोस्ट कोविड हेल्थ कॅम्प) दि. ११ नोव्हे. २०२० ते १३ नोव्हे. २०२० असे करण्यात आले आहे.
शिबिराची वेळ स. ९:०० ते दु. ४:०० असेल. स्वस्थवृत्त व योग विभागाच्या वतीने मोफत रोगप्रतिकार शक्ती वाढविण्या संदर्भात उपचार व मार्गदर्शन तसेच कोविड नंतरच्या आरोग्यविषयक उपचार आहार व योग यांचे मार्गदर्शन करण्यात येईल. शिबिरांनंतरही सदर सेवा रुग्णालयात उपलब्ध असेल. राष्ट्रीय आयर्वेद दिनानिमित्त आयुर्वेद महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा, इ – पोस्टर स्पर्धा व राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा.